चंद्रपूर : वैद्यकीय क्षेत्रासोबतच शिक्षण, कायदा व सामाजिक कार्यात नावलौकिक असलेले तरुण विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडे या तरुणांनी उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखतीही दिल्या आहेत. त्यामुळे या उच्चविद्याविभूषित तरुणांना संधी मिळते का, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात आजघडीला भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे तथा इतरही राजकीय पक्षांत वर्चस्व ठेवून असलेले नेत्यांच्याच हाती सर्व सूत्रे आहेत. त्यामुळे तरुणांना सक्रिय राजकारणाची संधी अजूनपर्यंत तरी मिळालेली नाही. अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे एकमेव उदाहरण सोडले तर युवकांपासून खासदारकी व आमदारकी दूरच आहे. मात्र, आता काही उच्चविद्याविभूषित तरुण राजकारणात सक्रिय होऊ पाहत आहेत.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
gulabrao deokar loksatta news
गुलाबराव देवकर यांचा प्रचार केल्याबद्दल ठाकरे गटाला पश्चाताप, जळगाव जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन
markadwadi villagers marathi news
मारकडवाडी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक, रामदास आठवले यांची भूमिका

या यादीत पहिले नाव डॉ. चेतन खुटेमाटे यांचे आहे. त्यांनी वरोरा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. शैक्षणिक व खासगी शिकवणीच्या व्यवसायात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे व आयआयएममधून एमबीएची पदवी प्राप्त केलेले प्रा. विजय बदखल यांनीही काँग्रेस पक्षाकडे वरोरा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. या दोघांनीही संवादाच्या माध्यमातून कुणबी समाजासाठी काम सुरू केले आहे. याच मतदारसंघातून माजी मंत्री संजय देवतळे यांचे पुत्र करण देवतळे यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Election 2024 : अहमदपूरच्या राजकारणाला नवे वळण

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चंद्रपूर मतदारसंघातून उच्चशिक्षित ॲड. राहुल घोटेकर, ॲड. प्रशांत रामटेके यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. ॲड. घोटेकर भाजपचे माजी नगरसेवक आहेत. मुनगंटीवार यांनीही ॲड. घाेटेकर यांच्यासाठीच प्रयत्न करायचे ठरवले होते. मात्र, काँग्रेस नेत्यांशी जवळीक घोटेकर यांना भाजपपासून दूर घेऊन गेली.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीत जळगाववरून तिढा! शरद पवार आग्रही; चारदा पराभव, तरीही काँग्रेस हट्ट सोडेना

बल्लारपूर मतदारसंघात डॉ. अभिलाषा गावतुरे, युवक काँग्रेस अध्यक्ष शंतनू धोटे यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. सामाजिक कार्यात आघाडी, ‘अदानी गो बॅक’ आंदोलन, ‘निर्भय बनो’चा लढा लढणारे वन्यजीव व पर्यावरणप्रेमी बंडू धोतरे यांनीही काँग्रेसकडे येथून उमेदवारी मागितली आहे. ओबीसींसाठी लढा लढत असलेल्या ॲड. अंजली साळवे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे.

दुसरीकडे कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी व पाठबळ असलेले युवकही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. यामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या तथा प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांचे नाव आघाडीवर आहे. त्या सोबतच खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांनाही वरोरा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी हवी आहे. यापूर्वीही जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या मुलांनी राजकारणात सक्रिय राहून आमदार व खासदार होण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. किमान आतातरी राजकीय पक्ष या तरुणांना संधी देतील, अशी अपेक्षा या तरुणांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader