आंध्रप्रदेशातील आत्मकुर मतदार संघात होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवण्याची सत्ताधारी वायएसार काँग्रेसला पूर्ण खात्री आहे. २३ जून रोजी इथे विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. येथील मुख्य विरोधी पक्ष असणारा तेलगू देसम पक्ष ही निवडणूक लढवणार नसल्यामुळे भाजपा हाच वायएसआर काँग्रेसचा प्रमुख प्रतिस्पर्धी असणार आहे. भाजपाची या मतदार संघात फारशी ताकद नसल्यामुळे सत्ताधारी पक्षासाठी ही निवडणूक सोपी समजली जातेय. वायएसआर काँग्रेस पक्षाचे आमदार आणि उद्योग मंत्री गौतम रेड्डी यांचे २१ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रेड्डी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. वायएसआर काँग्रेसने गौतम रेड्डी यांचे भाऊ विक्रम रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे तेलगू देसम पक्षाने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. टीडीपीचे प्रदेशाध्यक्ष के. अत्वनायडू म्हणाले की “पोटनिवडणुकीत मृत आमदारांच्या कुटुंबातील व्यक्तीसमोर उमेदवार उभा न करण्याची पक्षाची परंपरा आहे. अभिनेता के पवन कल्याण यांची संघटनासुद्धा ही निवडणूक लढवत नाही आहे. मात्र त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा