झोराम पिपल्स मुव्हमेंटच्या (झेडपीएम) नवख्या उमेदवारांनी मिझोराममध्ये सत्तास्थापनेची ३६ वर्षांची काँग्रेस-मिझो नॅशनल फ्रंटची (एमएनएफ) मक्तेदारी मोडीत काढली आहे. या विधानसभा निवडणुकीत झेडपीएमने सत्ताधारी एमएनएफचा दारूण पराभव केला. झेडपीएमला ४० पैकी २७ जागांवर विजयासह स्पष्ट बहुमत मिळालं. यासह त्यांच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

झेडपीएमने मिझोराम विधानसभेच्या ४० पैकी २७ जागा तर जिंकल्याच. शिवाय तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या झोरमथांगा यांचा त्यांच्या ऐझावल पूर्व (१) या मतदारसंघातून पराभव केला. झेडपीएमकडून पराभव झालेल्या उमेदावारांमध्ये उपमुख्यमंत्री ताऊनलाईया, मंत्री लालरौतकीमा, आर. लालथांगलियाना आणि राज्यातील एकमेव राज्यसभा खासदार के. वानलालवेना यांचाही समावेश आहे. झेडपीएमने ऐझावलमधील सर्वच्या सर्व १० जागा आणि लुंगलेईमधील सर्व ४ जागा जिंकल्या.

भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Solapur guardian minister marathi news
सोलापूरसाठी स्वतःचा हक्काचा पालकमंत्री मिळण्याची अपेक्षा
Chandrakant Patil
Chandrakant Patil : पुण्याचं पालकमंत्रिपद कोणाला मिळणार? चंद्रकांत पाटलांचं मोठं भाष्य; म्हणाले, “माझे वरिष्ठ…”
deputy chief minister position does not exist in constitution but post not unconstitutional
 ‘उपमुख्यमंत्री’ म्हणून शपथ घेता येते का?

झेडपीएमचं यश आणि त्यामागील कारणं

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत एमएनएफने २६ जागा जिंकल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत त्यांना केवळ १० जागांवर समाधान मानावं लागलं आहे. म्हणजेच मागील निवडणुकीच्या तुलनेत एमएनएफच्या एकूण १६ जागा कमी झाल्या आहेत.एमएनएफचा ज्या जागांवर विजय झाला त्यात दोन जागा चकमा या अल्पसंख्याक समुदायाचा बालेकिल्ला असलेल्या भागातील आहेत. एमएनएफने नेहमीच स्वतःला मिझो राष्ट्रवादी म्हणून सादर केलं. याच ओळखीवर ते निवडणुकीतही अवलंबून होते. मात्र, झेडपीएमने मिझो मतदारांना आपल्या बाजूने वळवत निवडणुकीत मोठा विजय मिळवलेला पहायला मिळाला.

भाजपाची रणनीती

दुसरीकडे भाजपाने जिंकलेले सैहा आणि पलक हे दोन्ही मतदारसंघ अल्पसंख्याक समुदायाचं प्राबल्य असलेले आहेत. २०१८ मध्ये भाजपाने एका जागेवर विजय मिळवत राज्यात आपला जम बसवण्यास सुरुवात केली होती. मात्र, मणिपूरमध्ये कुकी-झोमिस आणि मैतेई समाजात झालेल्या हिंसाचारामुळे भाजपाला प्रतिकुल स्थिती निर्माण झाली. कारण तो आणि मिझो समाज एकच वंशाचे आहेत. त्यामुळेच येथे भाजपाला फार संधी मिळणार नाही हे भाजपा जाणून होती. म्हणून त्यांनी आपली शक्ती आणि संसाधने अल्पसंख्याक समुदाय असलेल्या मतदारसंघात लावले. त्यामुळे भाजपाच्या जागांमध्ये वाढ झाली.

तिसरा पर्याय का निर्माण झाला?

अनेक वर्षांपासून आलटून पालटून काँग्रेस किंवा एमएनएफ सत्तेत येत असल्याने दोन्ही पक्षांविषयी मतदारांमध्ये विरोधी भावना होती. त्यामुळेच यावेळी निवडणुकीत झेडपीएमच्या रुपाने तिसरा पर्याय निर्माण झाला. त्याला सत्ताविरोधी भावनेची साथ मिळाली. या निकालानंतर झोरमथांगा आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर करतील. दुसरीकडे झेडपीएमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार लालदुहोमा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यामुळे लवकरच त्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम होईल.

Story img Loader