प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वाला सुरुवात झाली असून हळूहळू ही स्पर्धा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करते आहे. पहिल्या सत्रात चेन्नईमधले सामने पार पडल्यानंतर सध्या सोनिपतमध्ये प्रत्येक संघ मैदानात उतरले आहेत. मात्र आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये काही अनोख्या गोष्टी समोर आलेल्या पहायला मिळाल्या आहेत. अनुभवी खेळाडूंना टक्कर देत, नवोदीत खेळाडूंनीही अव्वल चढाईपटूंच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलं आहे.

उत्तर प्रदेशचा श्रीकांत जाधव, यू मुम्बाचा सिद्धार्थ देसाई, हरयाणाचा विकास कंडोला आणि तामिळ थलायवाजचा अतुल एम.एस. यांनी आपल्या धडाकेबाज खेळाने सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये कोणत्या चढाईपटूने पहिलं स्थान राखलं आहे आपण पाहूयात.

1) अजय ठाकूर – (तामिळ थलायवाज) – 5 सामन्यांत 60 गुण

2) नितीन तोमर – (पुणेरी पलटण) – 4 सामन्यांत 52 गुण

3) प्रदीप नरवाल – (पाटणा पायरेट्स) – 3 सामन्यांत 41 गुण

4) श्रीकांत जाधव – (यूपी योद्धा) – 4 सामन्यांत 36 गुण

5) सिद्धार्थ देसाई – (यू मुम्बा) – 3 सामन्यांत 36 गुण

याव्यतिरीक्त हरयाणाच्या विकास कंडोलाने 29 गुणांसह सातवं तर तामिळ थलायवाजच्या अतुल एम.एस. ने 24 गुणांसह नववं स्थान पटकावलं आहे. अ गटात बिगर अनुभवी खेळाडूंसह खेळणाऱ्या यू मुम्बाने सर्वांना आश्चर्यचकीत करत दुसरं स्थान पटकावलं आहे. तर दुसरीकडे ब गटात दिग्गज खेळाडूंसह मैदानात उतरललेल्या तामिळ थलायवाजला मात्र आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. आतापर्यंत तामिळ थलायवाजचा संघ ब गटात गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

(( महत्वाची सूचना – ही आकडेवारी 15 तारखेपर्यंतची आहे ))