गणपती विसर्जनाच्या वेळी निर्माल्य नदीत जाण्यापासून वाचवण्यासाठी विविध संस्था पुढे आल्या आहेत. ‘डी. एस. कुलकर्णीफाउंडेशन’ आणि ‘लायन्स क्लब इंटरनॅशनल’ या दोन्ही संस्थांचे स्वयंसेवक विसर्जन घाटांवर उभे राहून नागरिकांना निर्माल्य दानाचे आवाहन करणार आहेत.
डी. एस. कुलकर्णीफाउंडेशनतर्फे नागरिकांकडून निर्माल्य गोळा करून त्याचे खत तयार करून नागरिकांना मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमात रोटरी क्लब आणि ‘स्वच्छ’ या संस्थाही सहभागी झाल्या आहेत. डीएसके फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष श्याम भुर्के यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. ‘स्वच्छ’च्या प्रतिभा शर्मा आणि रिबेका केदारी, वसंत कुलकर्णी आदि या वेळी उपस्थित होते. ४ आणि ८ सप्टेंबरला संस्थेचे स्वयंसेवक बाबा भिडे पूल, गरवारे महाविद्यालय, वृद्धेश्वर घाट, दत्तवाडी घाट, ठोसरपागा, पुलाची वाडी, नेने घाट, पांचाळेश्वर, ओंकारेश्वर, अष्टभुजा, बापू घाट, विठ्ठल मंदिर या ठिकाणच्या नदीघाटांवर संस्थेचे स्वयंसेवक निर्माल्य संकलनासाठी उभारणार आहेत. नागरिकांनी निर्माल्य कागदी किंवा कापडी पिशवीत घालून स्वयंसेवकांना द्यावे, असे आवाहन संस्थेने केले असून १५ दिवसांनी खत स्वरूपात हे निर्माल्य नागरिकांना परत देण्यात येईल.
लायन्स क्लब इंटरनॅशनलचे दोन ते अडीच हजार सदस्य निर्माल्य दान उपक्रमात सहभागी झाले असल्याची माहिती आनंद आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. क्लबचे सुनील जवळेकर आणि समीर शहा या वेळी उपस्थित होते. ८ सप्टेंबरला सकाळी ९ वाजल्यापासून हे स्वयंसेवक १८ नदीघाटांवर उभे राहून जनजागृती करणार आहेत. होळकर घाट, ओंकारेश्वर, विठ्ठलवाडी घाट, औंध घाट, चिंचवडमधील मोरया गोसावी घाट, गरवारे पूल, राजाराम पूल, वडगाव कॅनॉल, मीरा सोसायटी कॅनॉल, अप्सरा थिएटरजवळील कॅनॉल, सारसबाग कॅनॉल, आकुर्डीतील गणेश तलाव येथे क्लबचे सदस्य उभे राहणार आहेत.
विविध संस्थांतर्फे नदीघाटांवर निर्माल्य दानासाठी जनजागृती
‘डी. एस. कुलकर्णीफाउंडेशन’ आणि ‘लायन्स क्लब इंटरनॅशनल’ या दोन्ही संस्थांचे स्वयंसेवक विसर्जन घाटांवर उभे राहून नागरिकांना निर्माल्य दानाचे आवाहन करणार आहेत.
First published on: 03-09-2014 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Awareness for nirmalya by lions club international