मराठा आरक्षणासाठी भाजपा सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं पुन्हा एकदा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज (सोमवार) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. मराठा समजाच्या हितासाठी आम्ही आंदोलनात पक्षाचा झेंडा, फलक अथवा बॅच न घेता, एक नागरिक म्हणून सहभागी होवू.

मराठा आरक्षण आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध विषयांवरील प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली. काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळेला पत्र पाठवले. पण त्यांनी अद्याप मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही. असं म्हणत नाराजी व्यक्त केली होती? याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “संभाजीराजेंनी विविध विषयांवर जेव्हा पंतप्रधान मोदींची भेट मागितली असेल, तेव्हा ती त्यावेळी नक्कीच मिळाली असेल. मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधान मोदींच्या हातात नाही. हा विषय राज्यांच्या सूचीमध्ये आहे. मराठा आरक्षणात केंद्राची भूमिका कुठं होती, जे ते निभावत आहेत. १०२ व्या घटना दुसरूस्तीनंतर देखील राज्याचा अधिकार आहे, हे एकदा न्यायालयाला समजून सांगण्याची भूमिका केंद्राने मान्यच केली आहे. केसमध्ये प्रभावीपणे भूमिका मांडली आहे आणि तरी देखील न्यायलायने दिलेल्या निर्णयावर पुनरविचार याचिका दाखल केली, हे (राज्यसरकार) अद्याप यासंदर्भात चर्चाच करत आहे. रिव्ह्यूयमध्ये अतिशय प्रभावीपणे केंद्र सरकार भूमिका मांडणार आहे. पण ५० टक्केचा अभाव व जात मागास हे सगळे विषय राज्याकडे सोपवलेले आहेत. त्यामळे संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या विषयात पंतप्रधान मोदींना भेटून काय होणार? पण कदाचित कोविडच्या काळात त्यांनी नाही म्हटलं असेल. त्यामुळे संभाजीराजेंनी काय म्हटलं हा विषय माझा नाही, माझं म्हणण असं आहे की, संभाजीराजे, विनायक मेट, राजेंद्र पोडरे, विनोद पाटील असू देत कुठल्याही नावाने जर आंदोलन करणार असतील, मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही त्यात बॅनर, झेंडा, बॅच शिवाय एक नागरिक म्हणून सहभागी होवू ”

मराठा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरायला लागू नये अशी भूमिका घ्या, संभाजीराजेंचं आवाहन

तसेच, करोनाचा विचार करून वेगवेगळ्या स्वरूपात दहावी, बारावीची परीक्षा झालीच पाहिजे. असं म्हणत,  सध्या हम करे सो कायदा असं सरकारचं धोरण आहे. अशी टीका देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केली.

“…तर हा संभाजी महाराज तुम्हाला आडवा येईल,” मराठा आरक्षणावरुन छत्रपती संभाजीराजे आक्रमक

खासगी रुग्णालयात लस उपलब्ध होते पण महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध होत नाही. तसेच सध्या खासगी रूग्णालयात कुठे ही एकच दर आकारले जात नाहीत. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “सप्टेंबर पर्यंत ४५ कोटी लस निर्मिती होईल, असा अंदाज आहे. सध्या शहरातील जो वंचित घटक आहे. अशा व्यक्ती करिता शहरातील आमदार, नगरसेवक यांनी आपल्या भागातील किमान दोन रुग्णालयात हजार लस उपलब्ध करून द्याव्यात, असा आमचा प्रयत्न राहणार आहे.”

बीडमध्ये ५ जूनला सरकार विरोधात मोर्चा – मेटे

बीड येथून शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे हे ५ जून रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढणार आहेत. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, “विनायक मेटे ५ तारखेला काढत असलेल्या मोर्चात आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा किंवा बॅच घेऊन सहभागी होणार नाही. पण एक नागरिक म्हणून पक्षातील सर्वजण सहभागी होणार आहोत. मराठा आरक्षण न मिळाल्याने मलमपट्टी होईल अशा योजना केल्या त्यात सारथी होती. मात्र सरकारने सारथीचे वाटोळं केले आहे.”