पिंपरी-चिंचवड मधील सर्वात लांब उड्डाण पुलावरून सध्या नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. उड्डाण पुलाचे काम हे अंतिम टप्प्यात असून हा उड्डाण पूल एम्पायर इस्टेट वरून गेला आहे. याला विरोध दर्शविण्यासाठी वसाहतीतील शेकडो नागरिकांनी महानगर पालिकेवर मोर्चा काढला.या उड्डाण पुलाची किंमत तब्बल ९८ कोटी रुपये आहे.
एम्पायर इस्टेट येथील वसाहतीवरून गेलेल्या उड्डाण पुलाचे काम २०११ रोजी महानगर पालिकेने सुरू केले,सद्य स्थितीला पुलाचे काम हे अंतिम टप्प्यात आहे. मात्र आता उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूने रॅम्प निघणार आहे. यामुळे वसाहती समोर वाहतूक कोंडी होणार असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली असून आज महानगर पालिकेवर शेकडो एम्पायर इस्टेट येथील रहिवाश्यांनी मोर्चा काढला.
१० हजार नागरिक याठिकाणी वास्तव्यास आहेत. येथील रहिवासी दीड कोटी रुपये टॅक्स महानगर पालिकेला नियमित भरत असल्याची भावना राहिवाशांनी व्यक्त केली. जर दोन्ही बाजूने रॅम्प झाले,तर बेमुदत उपोषणाचा इशारा महानगर पालिकेला राहिवश्यनी दिला आहे.
यावेळी रॅम्प रद्द करण्यासाठी घोषणा दिल्या,हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले होते. मुलांपासून वृद्धांपर्यंत मोर्च्या मध्ये रहिवाशी सहभागी झाले होते. या वसाहतीत सदनिका घ्यायची म्हटल्यास तब्बल कोट्यावधी रुपये मोजावे लागतात. या उड्डाण पुलाची लांबी पावणेदोन किलोमीटर आहे.