पुणे विभागात करोना विषाणूंचे रुग्ण वाढत असून, आज पुणे विभागात 403 करोना रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत 8 हजार 122 इतकी एकूण रुग्ण संख्या झाली आहे. तर एकुण 377 रुग्णांचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच, याच दरम्यान 3 हजार 841 इतके रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, पुणे जिल्हयात 6 हजार 604 इतकी करोना बाधित रुग्णांची संख्या झाली असून 3 हजार 355 रुग्णांना घरी सोडण्यात आहे. तर 295 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात एकूण 403 ने रुग्ण वाढले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात 301, सातारा जिल्ह्यात 59, सोलापूर जिल्ह्यात 32, सांगली जिल्ह्यात 6, कोल्हापूर जिल्ह्यात 5 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.     तर सातारा जिल्हयात 394 रुग्ण असून 122 बाधित रुग्ण बरे होवून घरी सोडले आहेत व एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर सोलापूर जिल्हयात 653 रुग्ण असून 297 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे व  64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सांगली जिल्हयात 88 रुग्ण असून 47 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  कोल्हापूर जिल्हयात 383  रुग्ण असून 20 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader