राज्यात सध्या मागील काही दिवसांपासून अतिशय चर्चेत असलेल्या एपीआय सचिन वाझे प्रकरणावरून आज(सोमवार) पुण्यात माध्यमांशी बोलताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक प्रश्न विचारला आहे. तसेच, यावेळी सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील गंभीर आरोप करत, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, “बेजबाबदार पणाची हद्द मी तुम्हाला सांगतो, सचिन वाझे हा कोण एवढा महान आहे? एका एपीआयसाठी अजय मेहताच्या नेतृत्वात एक पुनरावलोकन समिती नेमली. ज्यावेळी महाराष्ट्र १०० टक्के लॉकडाउनमध्ये होता. जून महिन्यात सचिन वाझेंचं निलंबन रद्द करून त्याला पुन्हा कामावर घेतलं.  सचिन वाझे हा एक साधारण एपीआय आहे, त्याच्यासाठी लॉकडाउनमध्ये अजय मेहताच्या नेतृत्वात समिती नेमली. त्या समितीचा अहवाल आला, त्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली. याचा अर्थ अनेक मोठी माणसं यामध्ये असेल. कोणते कॅबिनेट मंत्री मंत्रालयात मागील पाच वर्षे धक्के खात होते? मला शरद पवार यांना प्रश्न विचारायचा आहे, ज्यावेळी ३ मार्च २००४ रोजी सचिन वाझे निलंबित झाले होते. तेव्हा गृहमंत्री राष्ट्रवादीचेच होते. त्यानंतर नोव्हेंबर २००७ मध्ये फेर याचिका फेटाळली होती, त्यानंतर राजीनामा दिला तो स्वीकारला गेला, तेव्हाही राष्ट्रवादीचे गृहमंत्री होते. मग आता २०२० मध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांना सचिन वाझेमध्ये असं काय सापडलं? की त्यांनी समिती नेमली आणि त्यांनी तो समितीचा अहवाल स्वीकारून त्यावर स्वाक्षरी केली.”असं किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

“वाझेंसह शिवसेना नेते वरूण सरदेसाई यांचीही चौकशी करा”

तसेच, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक वसुलसाठी माणूस हवा होता. तो त्यांचा विश्वासाचा एक जूना शिवसैनिक, ५० कोटींची वसुली एवढ्या सहजरित्या होऊ शकते. हाच उद्देश असू शकतो, दुसरं काय असणार? आता अनिल देशमुख, अजय मेहता व उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यायचं आहे की, त्यांनी घेतल्यानंतर सात महिन्यात परत त्याला निलंबित करावं लागल ना? हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, की तुम्ही निर्णय घेतल्यानंतर सात महिन्यात परत त्याल निलंबित का करावं लागलं? एक एपीआय गुन्हे शाखेची गाडी घेऊन फिरतो आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह तीन दिवस त्यासाठी चकरा मारतात. आयुक्त एपीआयासाठी चकरा मारण्याचं मला एक उदाहरण शरद पवार यांनी दाखवावं. म्हणजेच याचा अर्थ झाला की सचिन वाझे हा एक त्यांचा विशेष माणूस, विशेष प्रकारच्या कामांसाठी आहे व ते विशेष काम कोणतं हे जगासमोर आलं आहे.” असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेत्यांना सचिन वाझेची वकिली का करावी लागते?”

सचिन वाझेचा उपयोग स्पेशल कामांसाठी उद्धव ठाकरे करायचे  – 

“सचिन वाझेंचे अनेक कंपन्यासोबतच्या व्यव्हरासंबधीची माहिती मी काल लोकांसमोर ठेवली आहे. त्यामध्ये शिवसैनिक भागीदार आहेत. दुसरी गोष्ट ५० कोटींची खंडणी, तिसरी गोष्ट म्हणजे सचिन वाझेचा उपयोग स्पेशल कामांसाठी उद्धव ठाकरे करायचे. हे सरकार म्हणजे माफियागिरी करणं आणि पैसे बनवणं हेच या सरकारचं काम आहे आणि सचिन वाझे त्यासाठी चांगला माणूस आहे.” अशा शब्दांमध्ये  किरीट सोमय्या यांनी यावेळी जोरदार टीका केली.

Story img Loader