तरुणाईच्या उत्साहाला, प्रायोगिकतेला योग्य व्यासपीठ देणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आता अगदी उंबरठय़ावर येऊन ठेपली आहे. स्पर्धेची पुणे विभागाची प्राथमिक फेरी ३ आणि ४ डिसेंबर रोजी नूमवि मुलींच्या प्रशालेत होणार आहे.
सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यभरात पुणे, मुंबई, ठाणे, नगर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक आणि रत्नागिरी अशा आठ केंद्रांवर होणार आहे. ‘झी युवा’, ‘क्रिएटिव्ह अॅकॅडमी, पुणे’, ‘केसरी’ हे या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत. अस्तित्वच्या सहकार्याने होत असलेल्या या स्पर्धेतील गुणी कलाकारांना चित्रपट, मालिकांमध्ये संधी देण्यासाठी ‘आयरिश प्रॉडक्शन’ या स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर म्हणून काम करत आहे.
प्रत्येक केंद्रातून प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरीत स्वत:ला सिद्ध करणारा संघ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत दाखल होणार आहे. पुणे विभागाची प्राथमिक फेरी ३ डिसेंबर (शनिवार) आणि ४ डिसेंबर (रविवार) या दोन दिवशी रंगणार आहे. या फेरीतील सर्वोत्तम एकांकिकेची निवड विभागीय अंतिम फेरीसाठी करण्यात येणार आहे. विभागीय अंतिम फेरीतील विजेता संघ १७ डिसेंबरला होणाऱ्या महाअंतिम फेरीत दाखल होणार आहे. स्पर्धेचे अर्ज ‘लोकसत्ता’ संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज भरण्यासाठी २१ नोव्हेंबपर्यंत मुदत आहे.
पुणे विभागातील स्पर्धेचे तपशील