आम्ही करुन दाखवलं अशा आशयाची मोठमोठी होर्डिंग्स शिवसेनेनी लावली. या होर्डिंग्जप्रमाणे त्यांनी खरचं करुन दाखवलं आणि मुंबईची तुंबई झाली. आता याची जबाबदारी त्यांनी घ्यायला हवी, असं विधान विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केलं आहे.

दरेकर म्हणाले, “मी यापूर्वीही बोललो होतो, पाऊस हा अचानक येतो का? पावसाळा संपल्यानंतर सात-आठ महिने आपल्या हातात असतात. कुठल्या ठिकाणी पाणी तुंबत या ठिकाणांची नोंदही आहे. पैशांची आपल्याला कमी नाही, मुबंईसाठी पाहिजे ती मशिनरी आपण घेऊ शकतो.”

“मुंबईकरांचे पन्नास हजार कोटी एफडीमध्ये आहेत आणि तरीही मुंबईकर जर प्रत्येक वर्षी पाण्यात जाणार असतील तर तीस-चाळीस वर्षे पालिकेत तुम्ही सत्ता उपभोगून काय केलंत? असा माझा शिवसेनेला प्रश्न आहे,” असे दरेकर म्हणाले.

आणखी वाचा- ठाकरे सरकार अहंकारी, आमच्या सूचनांची दखल घेत नाही – दरेकर

मुंबई शहराकडं शिवसेनेचं लक्ष नाही, त्यामुळं थोडासा पाऊस पडला तरी मुंबई पाण्याखाली जाते. तुंबणार पाणी समुद्रात कसं सोडायचं याचं सर्व नियोजन होऊ शकलं असतं पण यावर सर्व वरवरची काम केल्यानं मुंबईकरांच्या मूळ प्रश्नांकडे बघायला यांना वेळ नाही. उलटपक्षी करुन दाखवलं हे सांगण्यातच त्यांचा वेळ जातो, अशा शब्दांत दरेकर यांनी शिवसेनेवर टीका केली.