स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात यश मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील पुणे नगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपला चांगले यश मिळाले आहे. यापैकी पुणे जिल्ह्यातील पवार घराण्याचे वर्चस्व असलेल्या बारामती नगरपालिकेच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बारामतीचा गड राखण्यासाठी अजित पवार यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपने पवार घराण्याच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी आक्रमक प्रचार केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती नगरपालिकेच्या ३९ पैकी ३५ जागांवर विजय मिळवत बारामती म्हणजे पवार हे समीकरण कायम असल्याचे सिद्ध केले. याशिवाय, राष्ट्रवादीने याठिकाणी नगराध्यक्षपद जिंकून पालिकेची सर्व सूत्रे आपल्याच हाती ठेवली आहेत. मुख्यमंत्र्यांनी बारामतीत जाहीर सभा घेऊन राष्ट्रवादीला पाणी पाजण्याची भाषा केली होती. मात्र, बारामतीतील पवारांच्या क्लीन स्वीपमुळे भाजपच्या अपेक्षांवर पुरते पाणी फेरले गेले आहे. अनेक ठिकाणी भाजपने स्थानिक आघाड्यांशी जुळवून घेतले होते. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी संघटना, आरपीआयसह छोट्या पक्षांनी निवडणूक लढणाऱ्या भाजपला केवळ चार जागांवरच समाधान मानावे लागले. मात्र, दुसऱ्या बाजुला भाजपने पुणे जिल्ह्यातील अनेक पालिकांमध्ये मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्वच नेत्यांनी आक्रमक प्रचार केला होता. भाजप नेते गिरीश बापट यांनी पुणे आणि लातूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मते मिळाल्याचा दावा केला आहे. याशिवाय, नगराध्यक्षपदांच्या शर्यतीतही भाजप नंबर वनचा पक्ष ठरला आहे.

 

Farmer's Anger, Unmet Demands, Kishore Tiwari, Impact Mahayuti, Maharashtra, lok sabha elections, lok sabha 2024, election 2024, yavatmal news, marathi news, politics news,
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’
Akola Lok Sabha Constituency, Witnesses Triangular Contest, Focus on Community Gatherings, food arrangement in campaign , lok sabha 2024, bjp, congress, vacnhit bahujan aghadi, community melava, lok sabha campaign,
अकोला : प्रचारात भेटीगाठी, जेवणावळीची धूम, उमेदवारांकडून…
pimpri chinchwad cp vinay kumar choubey marathi news
पिंपरीत ‘चौबे पॅटर्न’, पोलीस आयुक्तांनी ३९ आरोपींवर लावला मोक्का; आतापर्यंत एकूण ३९६ आरोपींवर कारवाई
uture of 574 candidates in Talathi recruitment is uncertain
तलाठी भरतीतील ५७४ उमेदवारांचे भविष्य टांगणीलाच, जाणून घ्या कारण

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये पुणे आणि लातूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींचा समावेश होता. पहिल्या टप्प्यातील विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी भाजपने सारा जोर लावला होता.  पुण्यातील जेजुरी, बारामती, तळेगाव, लोणावळा, दौंड, सासवड, शिरूर, आळंदी, इंदापूर, जुन्नर या नगरपालिकांसाठी मतदान झाले. पुणे जिल्ह्यातील ३२४ जागांवर १३२६ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. जेजुरीत ८६.१४ टक्के मतदान झाले तर, तळेगाव ६८.२२, दौंड ६०.६१, सासवड ७५.१२, शिरूर ७३.४७, आळंदी ८२.३०, इंदापूर ७७.७२ तर जुन्नरमध्ये ७२.४३ टक्के मतदान झाले.
पहिल्या टप्प्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले होते. तब्बल ३१ नगरपालिका जिंकून भाजपने आघाडी घेतली आहे. तर ५२ ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आले आहेत. भाजपपाठोपाठ २० नगरपालिका जिंकत काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. काँग्रेसचेही २२ ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आले. तर राष्ट्रवादी १७ नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. शिवसेना १६ नगरपालिकांसह शेवटच्या क्रमांकावर आहे. त्रिशंकू अवस्थेतील नगरपालिकांची संख्या तब्बल ३४ आहे.

Live Updates
14:52 (IST) 15 Dec 2016
सासवड नगरपालिका निवडणुकीत जनमत आघाडी १५ जागांवर, तर शिवसेना ४ जागांवर विजयी; शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांना धक्का
14:51 (IST) 15 Dec 2016
लोणावळा नगरपरिषदेवर भाजपची सत्ता; नगराध्यक्षपदी भाजपच्या सुरेखा जाधव विजयी
14:51 (IST) 15 Dec 2016
तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत महायुतीच्या भाजपच्या उमेदवार चित्रा संदीप जगनाडे या १३ हजार ६३ मताधिक्याने विजयी
14:43 (IST) 15 Dec 2016
बारामती नगरपालिकेत ३९ पैकी ३५ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी
14:00 (IST) 15 Dec 2016
बारामती नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पोर्णिमा तावरे विजयी
13:56 (IST) 15 Dec 2016
सासवड नगराध्यक्षपदाच्या चुरसीच्या निवडणुकीत काँग्रेस जनमत विकास आघाडीचे मार्तंड भोंडे यांचा १५६ मतांनी विजय
13:55 (IST) 15 Dec 2016
लोणावळा नगरपालिकेच्या एकूण जागा २५ जागांपैकी भाजपा-रिपाइं युती ७, काँग्रेस ३, शिवसेना ४, अपक्ष २ जागांवर विजयी
13:54 (IST) 15 Dec 2016
जुन्नर नगरपालिकेच्या १६ जागांपैकी राष्ट्रवादी ४, शिवसेना ३, काँग्रेस १ आणि अपक्ष २ जागांवर विजयी
13:53 (IST) 15 Dec 2016
तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या एकूण जागा २६ जागांपैकी जनसेवा विकास आघाडी १५ (३ बिनविरोध) जागांवर विजयी
13:53 (IST) 15 Dec 2016
आळंदी नगरपालिका : एकूण जागा १८, भाजप ११, शिवसेना ५, अपक्ष (शिवसेना पुरस्कृत) २ जागांवर विजयी
13:53 (IST) 15 Dec 2016
सासवड नगरपालिका – एकूण जागा १९, अंतिम निकाल – जनसेवा विकास आघाडी १५, लोकमित्र सेवा ४ जागांवर विजयी
12:51 (IST) 15 Dec 2016
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; भाजप पुरस्कृत उमेदवाराकडून विद्यमान नगराध्यक्ष योगेश जगताप पराभूत
12:34 (IST) 15 Dec 2016
जुन्नर नगराध्यक्षपदी शिवसेनेचे शाम पांडे विजयी
12:22 (IST) 15 Dec 2016
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; भाजप पुरस्कृत आघाडीचे तीन उमेदवार आघाडीवर
12:17 (IST) 15 Dec 2016
तळेगावच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या चित्रा जगनाडे विजयी
12:10 (IST) 15 Dec 2016
जेजुरी नगरपालिकेतील दिलीप बारभाईंची ४२ वर्षांची सत्ता गेली
12:10 (IST) 15 Dec 2016
जेजुरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप बारभाईंना धक्का; नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सून मीनल बारभाई पराभूत
12:07 (IST) 15 Dec 2016
जेजुरी नगरपरिषद - काँग्रेस १० जागांवर विजयी, राष्ट्रवादी ७ जागांवर विजयी
12:02 (IST) 15 Dec 2016
आळंदी नगरपालिकेत भाजप सहा जागांवर विजयी
11:57 (IST) 15 Dec 2016
तळेगाव नगरपालिकेत जनसेवा विकास आघाडीची सत्ता
11:55 (IST) 15 Dec 2016
दौंड नगरपालिका – एकूण जागा २४, राष्ट्रवादी- ३ जागांवर विजयी
11:55 (IST) 15 Dec 2016
जुन्नर नगरपालिका – एकूण जागा १६, राष्ट्रवादी २, काँग्रेस १, शिवसेना २, आपला माणूस आपली आघाडी (मनसे-भाजप) २ जागा
11:54 (IST) 15 Dec 2016
जुन्नरमध्ये आपला माणूस आघाडीचा एका जागेवर विजय
11:53 (IST) 15 Dec 2016
इंदापूरच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अंकिता शहा विजयी
11:53 (IST) 15 Dec 2016
जेजुरीच्या नगराध्यक्षपदी काँग्रसेच्या वीणा सोनावणे विजयी
11:33 (IST) 15 Dec 2016
जुन्नर नगरपालिका – एकूण जागा १६, शिवसेना २, राष्ट्रवादी २ जागांवर विजयी
11:33 (IST) 15 Dec 2016
लोणावळा नगरपालिका – एकूण जागा २५, शिवसेना ३, भाजप २, अपक्ष २ जागांवर विजयी
11:14 (IST) 15 Dec 2016
तळेगाव नगरपरिषदेत भाजपचे १० नगरसेवक विजयी
11:12 (IST) 15 Dec 2016
लोणावळा नगराध्यक्षपद शिवसेना आघाडीवर
11:11 (IST) 15 Dec 2016
औसा नगरपालिकेत काँग्रेसला २ आणि भाजपला ६ जागा
11:11 (IST) 15 Dec 2016
औसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अफसर शेख विजयी
11:09 (IST) 15 Dec 2016
औसा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला २० पैकी १२ जागा
11:08 (IST) 15 Dec 2016
सासवड नगरपरिषदेत काँग्रेसचे २ नगरसेवक विजयी
11:08 (IST) 15 Dec 2016
औसा नगरपालिकेत काँग्रेसला धक्का; राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर
11:07 (IST) 15 Dec 2016
आळंदीच शिवसेनेचे दोन नगरसेवक विजयी
11:00 (IST) 15 Dec 2016
आळंदी प्रभाग क्र २ मध्ये शिवसेनेचे प्रतिमा गोगावले, तुषार घुंडरे विजयी
11:00 (IST) 15 Dec 2016
तळेगाव वॉर्ड ३ ब भाजपचे संग्राम काकडे विजयी
11:00 (IST) 15 Dec 2016
आळंदी नगरपरिषद प्रभाग १ भाजपचे सागर भोसले विजयी
10:59 (IST) 15 Dec 2016
शिरुर नगरपरिषदेत लोकशाही क्रांती आघाडीचे मंगेश खांडरे विजयी
10:37 (IST) 15 Dec 2016
शिरूरमध्ये शहर विकास आघाडी २० जागांपैकी ७ जागांवर विजयी
10:34 (IST) 15 Dec 2016
तळेगावात जनविकास आघाडीच्या ३ उमेदवारांची बिनविरोध निवड
10:33 (IST) 15 Dec 2016
तळेगाव पालिकेच्या तीन जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड
07:40 (IST) 15 Dec 2016
भाजपला दुसऱ्या टप्प्यातही चांगले यश मिळण्याची आशा; बारामतीसह बहुतेक सर्व शहरांमध्ये मुख्यमंत्र्यांचा जातीने प्रचार
07:40 (IST) 15 Dec 2016
इंदापूरमध्ये काँग्रेस नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
07:38 (IST) 15 Dec 2016
पहिल्या टप्प्यातील १६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट
07:37 (IST) 15 Dec 2016
पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा शिरकाव; बारामतीमध्ये फटका बसल्यास तो राष्ट्रवादीकरिता मोठा धक्का असेल
07:37 (IST) 15 Dec 2016
३९ सदस्यीय नगरपालिकेत बहुमत मिळविण्याबरोबरच नगराध्यक्ष निवडून आणण्याचे अजित पवार यांच्यासमोर आव्हान आहे.
07:37 (IST) 15 Dec 2016
बारामती पालिकेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष
07:36 (IST) 15 Dec 2016
सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात