रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत पराभूत झाले असले तरी अद्यापही तो मान्य करण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नाउमेद होऊन टोकाची भूमिका घेऊ नये असा सल्लाच दिला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. पुणे येथील अमनोरा पार्क येथे छत्रभुज नरसी आंतरराष्ट्रीय स्कूलच्या भूमिपूजन समारंभास उपस्थित होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल शरद पवारांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जगातील मोठी लोकशाही म्हणून अमेरिकेला ओळखलं जातं. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल काहीही असो, विजय मिळाला नाही म्हणून नाउमेद होऊन टोकाची भूमिका घेऊ नये. हा लोकांचा अधिकार आहे. निर्णय इतका स्वच्छ लागल्यानंतर अशा प्रकारची वक्तव्यं करणं त्यांच्या वयाला शोभत नाही,” असं शरद पवार यांनी म्हटलं. “मी १४ वेळा निवडणुकीत उभा राहिलो असं सांगताना पण लोकांनी कधी पाडलं नाही हे सांगायला विसरले नाहीत.

prakash mahajan on Raj thackeray
मनसेचे पदाधिकारी राजीनामा का देतायत? प्रकाश महाजन म्हणाले, “राज ठाकरेंमुळे आमची…”
Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?
Mallikarjun Kharge and narendra modi
मोदींनी झोपेच्या गोळ्या घेतल्यात का? चीनच्या घुसखोरीवर बोलताना मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Archana Patil joins NCP
अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; धाराशिवमधून उमेदवारी जाहीर, ओमराजे निंबाळकरांशी लढत

अर्णब गोस्वामींच्या अटकेवर पहिल्यांदाच शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
बिहार निवडणूक निकालावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

बिहार निवडणुकीवर प्रतिक्रिया, तेजस्वी यादव यांचं कौतुक
“मी जी संपूर्ण प्रचारमोहीम पाहिली त्यानुसार स्वत: पंतप्रधान यामध्ये खूप रस घेत होते. यामुळे एका बाजूला पंतप्रधान, नितीश कुमार यांच्यासारखे अनुभवी नेते आणि दुसऱ्या बाजूला अनुभव नसलेले पहिल्यांदाच निवडणूक लढणारे तेजस्वी यादव होते. यामुळे तेजस्वी यादव यांना जे यश मिळालं आहे ते खूप चांगलं आहे. यामुळे अनेक तरुणांमध्ये उमेद निर्माण होईल अशी मला आशा आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

“आज जरी बदल झाला नसला तरी हळूहळू बदल होत असल्याची वाट दिसू लागली आहे. नितीश कुमार यांना अजिबात फटका बसणार नाही असं सांगितलं जात आहे. भाजपाची संख्या वाढली, पण नितीश कुमार यांची संख्याही कमी झाली आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं. “तेजस्वी यादव यांना जितके मोकळे हात मिळतील तेवढं चागलं असं मत होतं, त्यामुळे तिथे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये चमत्कार झाला. हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

अन्वय नाईक कुटुंबीयांसोबतच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवर शरद पवारांनी केला खुलासा; म्हणाले…

अर्णब गोस्वामी अटकेवरुन राज्यपालांना टोला
रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटेकवरुन शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृतीवरुन चिंता व्यक्त केली आहे. शरद पवारांनी यावरुन राज्यपालांना टोला लगावला आहे.

शरद पवार म्हणाले की, “राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. हे चांगले आहे. पण मला वाटतं की, ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं”. अन्वय नाईक यांच्यासोबतचा माझा फोटो पाच वर्षांपूर्वीचा आहे असं यावेळी शरद पवारांनी स्पष्ट केलं.