नेतेमंडळी आणि त्यांचे समर्थक हे दिखाव्यासाठी काय करतील, याचा कधीच नेम नसतो. पिंपरीतही असाच काही प्रकार समोर येत आहे. पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांचे नाव आणि छायाचित्र काही दुचाकीस्वारांनी त्यांच्या नंबर प्लेटवर टाकले आहे. आता वाहतूक पोलीस या वाहनचालकांवर कारवाई काय करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुण्यातील अलका टॉकीज या ठिकाणी जागरुक नागरिकाने एम.एच-१४ एम.जी- ५९९ या नंबरच्या दुचाकीवर महापौर यांच्या नावाची नंबर प्लेट असलेला फोटो टिपला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. दुचाकीच्या नंबर प्लेटवर महापौर यांचे नाव तर खाली दुचाकीचा नंबर लिहिला आहे. पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये अनेक पक्षातील बड्या नेत्यांचे किंवा स्थानिक नगरसेवकांचे नाव हे नंबर प्लेटवर टाकण्यात आले असून अशा महाभागांवर वाहतूक पोलीस कारवाई करणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.