पिंपरी चिंचवडमधील कचरा डेपोला भीषण आग लागली आहे. महापालिकेचा हा कचरा डेपो मोशी येथे आहे. सव्वा आठच्या सुमारास आग लागली असून मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने आग सर्वत्र पसरू लागलीये.

यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या घटनास्थळी सहा अग्निबंब आहेत. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग लावण्यात आली आहे की लागली आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Story img Loader