राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय महाअधिवेशनात पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपरी-चिंचवडच्या महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी प्राथमिक चर्चा झाल्याचे महापौरांनी पत्रकारांना सांगितले.

आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर, एनसीए सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महापौर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, महेश लांडगे, जयदत्त क्षीरसागर, विजय वडेट्टीवार, परिणय फुके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या या भेटीत शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर प्राथमिक चर्चा झाल्याचे महापौरांनी सांगितले. दरम्यान, महापौर प्रतिनिधीत्व करत असलेल्या चिखली गावातील ग्रामस्थांच्या वतीने महापौर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. चिखलीचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवून गावचा सर्वार्थाने विकास करण्याची ग्वाही महापौरांनी सत्काराला उत्तर देताना दिली.

Story img Loader