पिंपरी-चिंचवडमध्ये पुण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीला करोना झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. संबंधित पोलीस कर्मचारी हे पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यास आहेत. तर ते आपलं कर्तव्य पुण्यात बजावतात. त्यामुळे करोना च लोण आता पोलिसांपर्यंत येऊन पोहचल असून त्यांनी स्वतः ची काळजी घेणे महत्वाचे आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधितांची संख्या आता ५१ वर पोहचली आहे.

पुणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाली आहे. खासगी लॅबमध्ये त्यांचे अहवाल पाठविण्यात आले होते त्यामध्ये दोघे ही पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झाले आहे. करोना पॉझिटिव्ह दाम्पत्याला दोन मुली आहेत. दाम्पत्यासह मुलींना महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून दोन्ही मुलींचे अहवाल हे पुण्यातील एनआयव्ही ला पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर दोन्ही मुलींना करोना लागण झाली आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, शहरातील करोना बाधितांचा आकडा हा पन्नाशी पार केली आहे. यातील 13 रुग्ण हे करोनामुक्त झाले असून ते बरे झाले असून ठणठणीत आहेत.

Story img Loader