पुण्यातील औंध भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक छोटं मंदिर उभारण्यात आलं आहे. भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी हे मंदिर उभारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे. अनेकजण येथे येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत आहेत. या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही लावण्यात आलाय.

नक्की पाहा > पुण्यातील मोदी मंदिराचे खास फोटो

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Police dressed as priests in Uttar Pradesh
अन्वयार्थ : पोलीस पुजारी.. की पुजारी पोलीस!
On the occasion of Prime Minister Narendra Modi visit to Kanhan Nagpur police force on high alert mode Nagpur
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…

मोदींच्या या मंदिरातील मूर्तीची उंची दोन फूट इतकी आहे. मोदींची ही मूर्ती खास जयपूर येथून तयार करून आणली आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागल्याचं मयुर मुंडे सांगतात. या मंदिरासमोर अनेकजण आवर्जून फोटो काढून घेतानाही दिसत आहेत. काहींना मोदींच्या मूर्तीसोबत सेल्फीचा मोहही आवरत नाहीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे.

मोदींचं हे मंदिर उभारण्यासाठी एका फाऊंडेशनने मुंडे यांना अर्थसहाय्य करण्यात आलंय. ‘नमो फाऊंडेशन’च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर उभारण्यात आलं आहे. हे मंदिर उभारण्यासाठी दीड लाख खर्च करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट रोजी लोकार्पण करण्यात आल्यापासून येथे अनेकजण हे मंदिर पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.