पुणे : साहित्य अकादमीतर्फे २०२०चे अनुवादासाठीचे पुरस्कार शनिवारी जाहीर करण्यात आले. त्यात मराठीतील अनुवादासाठी सोनाली नवांगुळ आणि संस्कृतमधील अनुवादासाठी डॉ. मंजुषा कु लकर्णी मानकरी ठरल्या आहेत.
डॉ. चंद्रशेखर कं बार यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी मंडळाने विविध भाषांतील २४ पुस्तकांची पुरस्कारांसाठी निवड के ली. पुरस्कासाठी २०१४ ते २०१८ या काळात प्रसिद्ध झालेली पुस्तके विचारात घेण्यात आली. त्यात मराठी, संस्कृत, कोंकणीसह अन्य भाषांचाही समावेश आहे. ५० हजार रुपये आणि ताम्रपट असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मराठीसाठी बलवंत जेऊरकर, डॉ. प्रतिमा इंगोले, डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी परीक्षण के ले, तर संस्कृतसाठी प्रा. बालकृष्ण शर्मा, डॉ. आर. शतावधानी, डॉ. सत्यनारायण यांनी परीक्षण के ले.
सोनाली नवांगुळ यांनी ‘इरंदाम जामांगलिन कथई’ या तमीळ कादंबरीचा ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या नावाने मराठीत अनुवाद के ला आहे. तर डॉ. मंजुषा कु लकर्णी यांनी डॉ. प्रकाश आमटे यांच्यावरील ‘प्रकाशवाटा’ या मराठी पुस्तकाचा ‘प्रकाशमार्गा:’ या नावाने संस्कृतमध्ये अनुवाद के ला आहे.
मराठीतून संस्कृतमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला प्रथमच पुरस्कार मिळाला आहे. मराठीतील कलाकृती संस्कृतमध्ये अनुवादित व्हाव्यात, संस्कृतमधील अभ्यासक, वाचकांपर्यंत पोहोचाव्यात या आंतरिक तळमळीने ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकाचा संस्कृतमध्ये अनुवाद के ला होता. २०१७मध्ये संस्कृत अनुवादाचे पुस्तक प्रकाशित झाले. या पुढेही साहित्याची अशाच प्रकारे सेवा करायची आहे. – डॉ. मंजुषा कु लकर्णी
‘मध्यरात्रीनंतरचे तास’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध के लेल्या ‘भारतीय लेखिका’ या मालिके तील आहे. त्यात सलमा या तमीळ लेखिके च्या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद मला मराठी अनुवादासाठी मिळाला होता. आतापर्यंत राज्यस्तरावर विविध पुरस्कार मिळाले आहेत, पण साहित्य अकादमीकडून अनुवादासाठी पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद झाला. मी अपंग असल्याने त्या दृष्टीने माझ्याकडे पाहिले जाते. पण मी लेखिका आहे आणि त्याचा अपंगत्वाशी संबंध नाही. त्यामुळे आपल्या कामावरून आपली गुणवत्ता तपासली जावी असे मला नेहमीच वाटते. साहित्य अकादमीच्या पुरस्काराने हे अधोरेखित झाले आहे. – सोनाली नवांगुळ