पिंपरी-चिंचवड शहरात अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा आणि चिखली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या केलेल्या कामगिरीमध्ये तब्बल १० लाख ८०० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.ही कामगिरी बुधवारी उशिरा करण्यात आली.यात सुगंधी तंबाखू,पान मसाला यांचा साठा जप्त केला.याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. समीर युनूस तांबोळी (वय-४५ रा.पवार नगर थेरगाव) आणि टेम्पो चालक सचिन गंगाधर पाटील (वय-२८ रा.मालेगाव नाशिक) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली विरोधी पथक गुन्हे शाखा हे रात्रीची गस्त घालत असताना हिंजवडीच्या छत्रपती शिवाजी चौकात हिरामण चाळ येथे दुचाकी क्रमांक-एम.एच-१४ एफ.पी-३४५८ ही संशयितरित्या आढळली. त्यावर ठेवलेल्या बॅगेत अधिकाऱ्यांना गुटखा आढळला त्यामुळे त्यांचा  संशय बळावला त्यामुळे समोरच असलेल्या गोदामाची पाहणी केली असता त्यात तब्बल ७ लाख ७१ हजार रुपयांचा गुटखा आढळून आला.तेथून दुचाकी चालकाला अंमली विरोधी पथक गुन्हे शाखाचे अधिकारी श्रीराम पोळ आणि वसंत मुळे यांच्या टीम ने ताब्यात घेत त्याला हिंजवडी पोलिसांच्या स्वाधीन केले.या घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली.त्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली.

तर दुसरी कामगिरी चिखली पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केली.यात त्यांनी तब्बल २ लाख ३७ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.टेम्पो चालक सचिन गंगाधर पाटील हा देहू आळंदी रस्त्यावरून गुटख्याची वाहतूक करत होता.त्याला गस्त घालत असलेल्या चिखली पोलिसांनी हटकले.तेव्हा या सर्व प्रकार समोर आला टेम्पो मध्ये सुगंधी तंबाखू,पान मसाला यांची पॅकेट मिळेल आहेत.याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाने फिर्याद नोंदवली आहे.

 

 

 

Story img Loader