पिंपरी-चिंचवडच्या सांगवी पोलिसांसमोर सध्या एका बूटचोराला पकडण्याचं आव्हान निर्माण झालेलं आहे. पिंपळे गुरव परिसरातील एका घरासमोर ठेवण्यात आलेल्या कपाटातून, अज्ञात व्यक्तीने नामवंत कंपनीचे ब्रँडेड शूज लंपास केले आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विद्या समाधान कदम यांनी सांगवी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलेली आहे, त्यामुळे पोलिसांसमोर या अज्ञात बूटचोराला पकडायचं कसं असा प्रश्न निर्माण झालेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेलं नसून, या चोराचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी विद्या कदम यांच्या राहत्या घरासमोरून कपाटामधून २८५० रुपयांचे शूज चोरीला गेले. चोरी करतानाचा हा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. चोरीच्या वस्तुंना चोरबाजारात चांगली किंमत मिळते, यासाठी अनेक भुरटे चोर पुणे ग्रामीण परिसरात अशा छोट्या छोट्या चोऱ्या करत असतात. अशा चोऱ्यांमधून त्यांना भरपुर पैसे मिळत असल्यामुळे अनेक तरुणही या चोऱ्यांमध्ये सहभागी होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे सांगवीतले पोलीस या शूजचोराचा शोध घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader