लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोणावळा : मावळ तालुक्यातील पवनानगर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. खूनामागचे कारण समजू शकले नाही.

निलेश दत्तात्रय कडू (वय ३०, रा. सावंतवाडी, महागाव, ता. मावळ, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पवनागर भागातील प्रभाचीवाडी परिसरात कडू यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच लोणावळ्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र मायने, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आणखी वाचा-पिंपरी : फटाक्यांमुळे दहा ठिकाणी आगीच्या घटना; कासारवाडीतील तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेला आग

कडू भारतीय जनता पक्ष विद्यार्थी आघाडीचा पदाधिकारी होते. त्यांच्या खूनामागचे कारण समजू शकले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, काही संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp worker was stoned to death in pavananagar in maval pune print news rbk 25 mrj