सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांना एक कोटी रूपयांचा गंडा घालणाऱ्या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी बिहारमधून ताब्यात घेतले.राजीवकुमार शिवाजी प्रसाद, चंद्रभूषण आनंद सिंग,कन्हैया कुमार संभो महतो आणि रवींद्र कुमार हुबनाथ पटेल अशी आरोपींची नावे आहेत.आदर पुनावाला यांचा मोबाइल क्रमांक हॅक करून चोरट्यांनी बनावट संदेश तयार केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पुणे:अभाविपचे एमआयटीमध्ये आंदोलन

सिरमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संदेश पाठवून विविध खात्यांत पैसे पाठविण्यास सांगितले होते. त्याद्वारे एक कोटी एक लाख रुपयांची फसवणूक केली होती.या टोळीने देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची माहिती घेऊन अशा प्रकारे फसवणूक केल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळून आले आहे. बंडगार्डन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 crore fraud by adar poonawalla pune print news amy