लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे : सोन्या मारुती चौकात एका सराफी पेढीतील कर्मचाऱ्याने एक कोटी १५ लाख ४२ हजार रुपयांच्या सोनसाखळ्या लांबविल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी कर्मचाऱ्याविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

विक्रम अमृतलाल बाफना (रा. गिरगाव, मुंबई) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत सराफी पेढीचे मालक जितेंद्र धनराज सोनीग्रा (वय ४५) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनीग्रा शहरातील घाऊक स्वरुपात सोन्याच्या दागिन्यांची विक्री शहरातील छोट्या सराफांना करतात. सोनीग्रा यांच्या पेढीत बाफना कामाला होता. बाफना याला विश्वासाने सोनीग्रा यांनी एक कोटी १५ लाख ४२ हजार रुपयांच्या २४५ सोनसाखळ्या दिल्या होत्या.

आणखी वाचा-पुणे : शहरातील २३ हजार मिळकती करकक्षेत… करबुडव्यांचा शोध सुरू

बाफना सोनसाखळ्या चोरुन पसार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सोनीग्रा यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.