जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. मंदिराच्या दान पेटीत हेच भाविक दान टाकतात. त्याची मोजणी करण्यासाठी पेट्या आज उघडण्यात आल्या आहेत. अंदाजे १० ते १२ लाख रुपये दान पेटीतून निघतीलस अशी माहिती विश्वस्त नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे. स्व: काम ही संस्था पैसे मोजत तसेच पैशांच्या विभाजन करते.
हेही वाचा- पुणे : युवकांमुळेच देश महासत्ता; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मत
देहूतील तुकोबांच्या मंदिरात भाविकांनी भरभरून दान दिलं आहे. आळंदीतील कार्तिकी एकादशी नुकतीच पार पडली असून तेथील भाविक तुकोबांच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळं दान पेटीत लाखोंचं दान पडलं. दोन महिन्यांनी दान पेट्या उघडण्यात आल्या असून स्व:काम या संस्थेच्यावतीने ह्या पैशांची मोजणी विश्वस्त नितीन महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे यांच्या समोर करण्यात आली. अंदाजे १० ते १२ लाख रुपयांचे दान असेल अशी माहिती विश्वातांनी दिली आहे. स्व: काम ही संस्था गेल्या काही वर्षांपासून देहूतील मंदिरात विनामोबदला मंदिरातील स्वच्छतेसह इतर काम करतात.