लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : आवक कमी झाल्याने लसूण, भेंडी, गवार, कोबी, फ्लॉवर, घेवड्याच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (१ सप्टेंबर) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ७ ते ८ टेम्पो कोबी, कर्नाटक आणि गुजरातमधून ३ ते ४ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ४ ते ५ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातील इंदूर भागातून १० ते १२ टेम्पो गाजर, गुजरातमधून ३ ते ४ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

आणखी वाचा-झुंडशाही, समाज माध्यमातील टीका, टिपणीवर न्यायमूर्ती अभय ओक यांचे परखड भाष्य; म्हणाले, “न्यायव्यवस्था टिकवण्यामध्ये…”

पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई, सातारा परिसरातून मटार ७ ते ८ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ७ ते ८ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ६० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४० टेम्पो बटाट्याची आवक झाली.

पालेभाज्या तेजीत

पावसामुळे पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवकही कमी होत असून, सर्व पालेभाज्यांचे दर तेजीत अहोत. मागणी वाढल्याने कोथिंबीर, मेथी, शेपू, करडई आणि अंबाडी या पालेभाज्यांच्या दरात अल्पशी वाढ झाली. कांदापात, मुळे, राजगिरा, चाकवत, पुदीना, चवळई, पालकचे दर स्थिर आहेत. तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर ७० जुडी, मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर – ३००० ते ४००० रुपये, मेथी – १५०० ते २५०० रुपये, शेपू – १००० ते १५०० रुपये, कांदापात – १५०० ते २००० रुपये, चाकवत – ८०० ते १००० रुपये, करडई – ५०० ते ८०० रुपये, पुदिना – ५०० ते १००० रुपये, अंबाडी – ५०० ते १००० रुपये, मुळे – १००० ते १८०० रुपये, राजगिरा – ५०० ते ८०० रुपये, चुका – ५०० ते १००० रुपये, चवळई – ५०० ते ८०० रुपये, पालक – १००० ते १८०० रुपये.

आणखी वाचा-आमदार चेतन तुपे यांना ‘उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार’ जाहीर

फळांचे दर स्थिर

फळबाजारात अननस, लिंबू, डाळिंब, संत्री, मोसंबी, कलिंगड, खरबूज, सीताफळ, पपई, चिकू, पेरुचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी अननस ५ ट्रक, मोसंबी ९० ते १०० टन, संत्री ५ ते ६ टन, डाळिंब ५० ते ६० टन, पपई ८ ते १० टेम्पो, लिंबे १२०० ते १५०० गोणी, कलिंगड ३ ते ४ टेम्पो, खरबूज ३ ते ४ टेम्पो, चिकू दीड हजार खोकी, पेरू ५०० प्लास्टिक जाळी (क्रेट). सीताफळ २५ ते ३० टन अशी आवक झाली.

Story img Loader