सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि ठेकेदारांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पीएमपीकडून शंभर गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. तसा विचार पीएमपी प्रशासनाकडून सुरू करण्यात आला असून संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत तसा प्रस्ताव संचालक मंडळापुढे ठेवण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

पीएमपीच्या ताफ्यात २ हजार १४२ गाड्या आहेत. यातील पीएमपीच्या मालकीच्या ७६० गाड्या असून ९०० गाड्या ठेकेदारांच्या आहेत. पीएमपीला दैनंदिन दीड कोटींचे उत्पन्न मिळते. मात्र पीएमपीला ठेकेदारांना मोठ्या प्रमाणावर देयके द्यावी लागत आहे. त्यामुळे ठेकेदारांच्या गाड्यांचा कमी वापर करण्याचे आणि उत्पन्नवाढीसाठी विशेष प्रयत्न पीएमपीकडून सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार स्वमालकीच्या शंभर गाड्या घेण्याचे पीएमपीच्या विचाराधीन आहे.

हेही वाचा >>>पुणे: गोल्फ चौकातील उड्डाणपूल डिसेंबरपासून वाहतुकीसाठी खुला

पीएमपी पहिल्या टप्प्यात स्वतःच्या मालकीच्या १०० नवीन बसची खरेदी करणार आहे. त्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेशी चर्चा करून सर्वांत कमी व्याजदर असलेल्या बँकेकडून अर्थसाहाय्य घेण्याचे नियोजित आहे. नवीन बस खरेदी करताना ६० बस या इलेक्ट्रिक तर ४० बस सीएनजीवरील खरेदी करण्यात येणार आहेत. बस खरेदीसाठी रोजच्या उत्पन्नात तीन ते पाच लाख रुपयांची वाढ होईल, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आदेश वाहतूक विभागाला दिले आहेत.