दाढी आणि केशकर्तनाची दरवाढ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केशकर्तनालय सेवांमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यापुढे साध्या दाढीसाठी पन्नास रुपये तर, केस कापण्यासाठी शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. नव्या वर्षांपासून म्हणजे एक जानेवारीपासून या दरवाढीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सलूनला लागणारे कॉस्मॅटिक आणि अन्य वस्तूंच्या खरेदीवरचा खर्च वाढला असल्याची भूमिका अनेक व्यावसायिकांनी मांडली. त्याचप्रमाणे नाभिक बांधवांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्येही वाढ झाली असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) या कारणांमुळे गेल्या दोन वर्षांत सलूनच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळेही नाभिक बांधवांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. या वाढत्या खर्चावर मार्ग काढून आर्थिक सुधारणा करण्यासाठी सलून व्यावसायिकांना दरवाढ करणे अनिवार्य झाले असल्याची भूमिका काही सदस्यांनी मांडली. त्यानंतर दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस महामंडळाचे आजीव सभासद नानासाहेब आढाव, अध्यक्ष चंद्रशेखर जगताप, सरचिटणीस दत्तात्रय मोरे यांच्यासह नाभिक व्यावसायिक उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 rupees for cutting hair in new years
Show comments