कर्ज मंजुरीच्या आमिषाने १२ लाख ३० हजारांची फसवणूक करुन पसार झालेल्या एका तरुणीसह साथीदाराला गुजरातमधील सूरत शहरातून अटक करण्यात आली. स्वारगेट पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींनी १०० ते १५० जणांची कर्ज मंजुरीच्या आमिषाने फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> लाचखोर महिला तलाठीस पाच वर्षांची सक्तमजुरी

दीपाली जितेंद्र पौनिकर (वय ३२), हेमराज जीवनलाल भावसार (वय २८ दोघे रा. सार्थक सोसायटी, सिंगनपूर, सूरत, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दिपाली आणि हेमराज यांनी स्वारगेट भागातील मुकुंदनगर भागात एका इमारतीत मानधन मायक्रो फायनान्स नावाची बनावट वित्तीय संस्था सुरू केली. गुलटेकडी भागातील कष्टकरी वर्गातील अनेकांना दिपाली आणि हेमराज यांनी त्वरीत कर्ज उपलब्ध करुन देण्याची बतावणी केली होती. त्यानंतर दोघांनी कर्ज मंजुरीच्या आमिषाने पैसे उकळले होते. कर्ज मंजूर न करता दोघेजण कार्यालय बंद करुन पसार झाले.

हेही वाचा >>> ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून २२ लाखांची रोकड लंपास; पुण्यातील सॅलसबरी पार्क परिसरातील घटना

फसवणूक झाल्याचे लक्षात अनेकांनी पोलिसांकडे स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक सोमनाथ जाधव, उपनिरीक्षक अशोक येवले, फिराेज शेख, शिवदत्त गायकवाड, घुले, गोंडसे, होळकर यांनी तपास सुरू केला. दीपाली आणि हेमराज सूरतमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दोघांना सूरतमधून अटक केली.

हेही वाचा >>> आमचे डोळे कधी उघडणार? अमोल पालेकर यांचा सवाल

चित्रपट निर्मितीसाठी कष्टकरी वर्गातील अनेकांना गंडा
दिपाली आमि हेमराज दोघे एकत्र राहतात. दोघांना नृत्याची आवड असून दोघांनी नृत्याची ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित करुन लोकप्रियता मिळवली आहे. दोघांना चित्रपटात काम करायचे होते. मात्र, त्यांच्याकडे पैसे नसल्याने दोघेजण पुण्यात आले. चित्रपट निर्मितीसाठी त्यांनी बनावट वित्तीय संस्था सुरू केली. त्वरीत कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या आमिषाने दोघांनी अनेकांना गंडा घातला असून स्वारगेट पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 to 150 people cheated with the lure of loan approval pune print news amy