गणेशोत्सवाच्या काळामध्ये बंदोबस्तासाठी यावर्षी पिंपरी-चिंचवडमध्येही पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी पोलिसांना मदत करणार असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दहा हजार विद्यार्थी ‘पोलीस मित्र’ म्हणून काम करणार आहेत.
गणेशोत्सवाच्या काळामध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, उत्सवाच्या आणि मिरवणुकीच्या काळात बंदोबस्तासाठी पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी ‘पोलीस मित्र’ म्हणून काम करतात. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येतो. यावर्षी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड यासाठी दहा हजार विद्यार्थी ‘पोलीस मित्र’ म्हणून काम करणार आहेत. त्यामध्ये पन्नास टक्के मुली आहेत. पुण्यामध्ये सात हजार आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तीन हजार विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक शकीरा इनामदार यांनी दिली.
पोलीस मित्र म्हणून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येणार असून पुण्यामध्ये सोमवारपासून या शिबिराची सुरूवात झाली, तर मंगळवारपासून पिंपरी-चिंचवडमध्ये ही शिबिरे सुरू होणार आहेत. एक आठवडय़ाच्या कालावधीमध्ये ही प्रशिक्षण शिबिरे होणार आहेत.

Story img Loader