पुणे : स्वातंत्र्य दिन आणि पारशी नववर्षानिमित्त सार्वजनिक सुटी असल्याने प्रवाशांना पर्यटन आणि धार्मिक स्थळांना भेट देता यावी, यासाठी पीएमपीकडून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. आज आणि उद्या (१५ आणि १६ ऑगस्ट) १७ मार्गांवर १०१ जादा गाड्या सोड्यात येणार आहेत, अशी माहिती पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा : पुणे : लोकअदालतीत तडजोडीसाठी ७५ हजार ४०४ दावे
हडपसर-जेजुरी, हडपसर-मोरगाव, निगडी-लोणावळा, वाघोली-रांजणगाव, हडपसर-थेऊरगाव, हडपसर-रामदरा, शनिवारवाडा-सिंहगड किल्ला, महापालिका भवन-देहूगाव, स्वारगेट-आळंदी, महापालिका भवन-आळंदी, पुणे रेल्वे स्थानक-आळंदी, भेकराईनगर-आळंदी, शेवाळवाडी-आळंदी, म्हाळुंगे गाव-आळंदी, बाणेरगाव-आळंदी, स्वारगेट-खानापूर, कात्रज-सासवड या मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. या १७ मार्गांवर एकूण १०१ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> मुंबई-बंगळुरू महामार्गाचे किवळे ते वाकडदरम्यान रुंदीकरण
दोन मार्गांचा विस्तार
पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते देहूगाव आणि निगडी ते देहूगाव या दोन मार्गांचा विस्तार पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, मंगळवारपासून (१५ ऑगस्ट) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पिंपरी-चिंचवड भवन ते देहूगाव या मार्गाचा विस्तार अभंगनगरी, भैरवनाथ चौक, संत तुकाराम क्रीडा संकुल, वडाचा माळ मार्गे करण्यात आला आहे. या मार्गावर दर दोन तास १५ मिनिटांनी बस धावणार असून, निगडी-देहूगाव मार्गाचा विस्तार अभंगनगरी, भैरवनाथ चौक, संत तुकाराम क्रीडा संकुल, वडाचा माळ, देहूगाव असा असेल. दर ४५ मिनिटांनी या मार्गावर बस धावणार आहे.