पुणे : राज्यातील रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये राज्यातील लाखो रुग्णांना जीवदान मिळाले आहे. २०१४ ते २०२२ या कालावधीत राज्यातील ८१ लाख ५२ हजार १८१ नागरिकांना १०८ रुग्णवाहिका सेवेचा उपयोग झाला आहे. हृदयविकाराचे रुग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती ते गर्भवती महिला अशा अनेकांचा यामध्ये समावेश आहे.

जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या एका वर्षात राज्यातील १४ लाखांहून अधिक रुग्णांना महाराष्ट्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभागाच्या १०८ रुग्णवाहिकेने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली आहे. अपघातात जखमी झालेले रुग्ण, आगीसारख्या घटनांमध्ये भाजलेले रुग्ण, हृदयरुग्ण, उंचावरून पडून जखमी झालेले, विषबाधा झालेले, एखाद्या आपत्तीत झालेली सामूहिक इजा (मास कॅज्युअल्टी), गर्भवती महिला, आत्महत्येसारखा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती अशा अनेकांना या सेवेचा उपयोग झाला आहे. १०८ रुग्णवाहिका अद्ययावत असल्याने नऊ वर्षांमध्ये ३८७५ रुग्णांना अतिदक्षता विभागातील उपचारही याच रुग्णवाहिकेत उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात

हेही वाचा – तुकड्यातील एक-दोन गुंठे जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी होणार का? निर्णय आठ दिवसांत

कोणाला उपयोग झाला?

महाराष्ट्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात ‘१०८’ च्या ९३७ रुग्णवाहिका आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातील शहरी आणि दुर्गम भागातील रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार देणे आणि रुग्णालयापर्यंत पोहोचवणे अशा दोन प्रकारचे काम १०८ रुग्णवाहिका करते. २०२२ मध्ये १४ लाखांवर रुग्णांसाठी या सेवेचा उपयोग झाला आहे. १०८ हा क्रमांक मोफत मदत क्रमांक असल्यामुळे कोणीही १०८ वर संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी करू शकतो.

रुग्णवाहिका कशी उपलब्ध होते?

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘१०८ रुग्णवाहिका’ सेवा ही तातडीच्या उपचारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १०८ या मोफत मदत क्रमांकावर (टोल फ्री क्रमांकावर) संपर्क साधून ही रुग्णवाहिका मागवणे शक्य आहे. १०८ च्या सुसज्ज आणि अद्ययावत नियंत्रणकक्षाद्वारे नजीकच्या रुग्णवाहिकेला रुग्णापर्यंत पोहोचण्यास मदत केली जाते. त्यामुळे कमीत कमी वेळात प्राथमिक, तसेच अनेकदा अगदी तातडीचे उपचारही १०८ मध्ये उपलब्ध झाल्याने रुग्णांचा जीव वाचतो.

हेही वाचा – पुणे : रिंग रोड घेणार वेग, भूसंपादनासाठी स्वतंत्र कक्ष

३८,४६४ बाळांचे जन्मस्थान

२०१४ ते २०२२ या नऊ वर्षांच्या काळात राज्यातील ३८,४६४ बाळांचा जन्म १०८ रुग्णवाहिकेत झाला आहे. २०१८ मध्ये सर्वाधिक म्हणजे ११,१४१ बाळांचा जन्म रुग्णवाहिकेत झाला आहे. २०२२ मध्ये ही संख्या ११९७ एवढी नोंदवण्यात आली आहे.