पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या (२३ ऑगस्ट) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे दहावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत, तर बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. गुणपडताळणी, छायाप्रतीसाठी २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे.  https://maharesult.nic.in/ आणि mahasscboard.in या संकेतस्थळांद्वारे निकाल पाहता येणार आहे.  

tet conducted by Maharashtra State Examination Council has been declared final result
टीईटीचा अंतरिम निकाल जाहीर
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द
BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी
Results of the sixth exam for MahaRERA brokers announced
महारेराच्या दलालांच्या सहाव्या परीक्षेचा निकाल जाहीर, ७६२४ पैकी ६७५५ परीक्षार्थी उत्तीर्ण
strict action against students if found with a mobile phone in an exam
खबरदार ! परीक्षेत विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळल्यास आता इतके वर्ष…
UPSC CSE 2025 Exam Notification
UPSC CSE 2025 Exam Notification : UPSC कडून नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जारी! गेल्या ३ वर्षांतील सर्वात कमी जागांची जाहिरात
New admit cards , 12th exam, State board decision,
बारावीच्या परीक्षेसाठी नवीन प्रवेशपत्रे, जात प्रवर्गाच्या उल्लेखावरील आक्षेपानंतर राज्य मंडळाचा निर्णय

हेही वाचा >>>कल्याणीनगर अपघात प्रकरण: रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अगरवाल दाम्पत्य, डॉक्टरांसह इतरांचा जामीन अर्ज फेटाळला

यंदा दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी २८ हजार ९७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात २० हजार ३७० मुले, ६ हजार ६०५ मुली, एक तृतीयपंथी विद्यार्थ्याचा समावेश होता. तर बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ५६ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात ३६ हजार ५९० मुले, २० हजार २५० मुली, पाच तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश होता.

Story img Loader