पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या (२३ ऑगस्ट) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे दहावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत, तर बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. गुणपडताळणी, छायाप्रतीसाठी २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. https://maharesult.nic.in/ आणि mahasscboard.in या संकेतस्थळांद्वारे निकाल पाहता येणार आहे.
हेही वाचा >>>कल्याणीनगर अपघात प्रकरण: रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अगरवाल दाम्पत्य, डॉक्टरांसह इतरांचा जामीन अर्ज फेटाळला
यंदा दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी २८ हजार ९७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात २० हजार ३७० मुले, ६ हजार ६०५ मुली, एक तृतीयपंथी विद्यार्थ्याचा समावेश होता. तर बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ५६ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात ३६ हजार ५९० मुले, २० हजार २५० मुली, पाच तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
© The Indian Express (P) Ltd