पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू झाली. दहावीच्या परीक्षेसाठी ४९ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या परीक्षेसाठी ७० हजार ४६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, दोन्ही परीक्षांसाठी मुंबई विभागातून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

राज्य मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या नियमित परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी देण्यासाठी पुरवणी परीक्षा घेतली जाते. तसेच श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या परीक्षेत संधी मिळते. या परीक्षेसाठी राज्य मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची सर्वसाधारण आणि द्विलक्षी विषयांची परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होईल. तर व्यवसाय अभ्यासक्रमांची परीक्षा १८ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत होईल. तर दहावीची परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षाही १८ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान, बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १८ जुलै ते ५ ऑगस्टदरम्यान होणार आहे.

MPSC announced that it will now conduct screening exams for 33 posts of various types
मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून तब्बल ३३ पदांच्या चाळणी परीक्षेसाठी…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Maharashtra Board s Class 12admit card will be available online from Friday January 10
राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
MPAC Mantra Intelligence Test and Arithmetic Group B Non Gazetted Services Pre Exam sports news
एमपीएसी मंत्र: बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित; गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा
online exam for post of Clerk and Constable of Cooperative Bank canceled due to technical glitches
चंद्रपूर : परीक्षार्थ्यांना ऑनलाइन उत्तरपत्रिका मिळताच जिल्हा बँकेचे संचालक मंडळ अस्वस्थ; भरती प्रक्रिया…
CBSE Class 12th exam and two CET exams at same time
सीबीएसई बारावीची परीक्षा, दोन सीईटी परीक्षा एकाच वेळी… कोणत्या वेळापत्रकात बदल होणार?
neet ug exam supreme court
शिफारशींची नीट अंमलबजावणी केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती
Mumbai University TYBCom semester 5 result announced
तृतीय वर्ष ‘बी. कॉम.’ पाचव्या सत्र परीक्षेत ४१.७५ टक्के उत्तीर्ण; मुंबई विद्यापीठाकडून १८ दिवसांत निकाल जाहीर

हेही वाचा – पुणे महापालिकेतील मराठी भाषा संवर्धन समिती कागदावर

हेही वाचा – पुणे: सिंहगडाच्या जंगलात बिबट्याचा वावर; मोरदरवाडीतील ग्रामस्थ भयभीत

यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ७० हजार ४६२ विद्यार्थ्यांनी, तर दहावीच्या परीक्षेसाठी ४९ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक विद्यार्थी नोंदणी मुंबई विभागाअंतर्गत झाली आहे. त्यात बारावीसाठी २९ हजार ४५८ विद्यार्थ्यांनी आणि दहावीसाठी १५ हजार १३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

Story img Loader