पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात भरधाव ट्रकची प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला धडक बसल्याने ११ जण जखमी झाले. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी रात्री ही दुर्घटना घडली. पुण्याकडून मुंबईकडे निघालेल्या ट्रकचे खंडाळा घाटात ब्रेक निकामी झाले. ट्रक रस्ता दुभाजक ओलांडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या प्रवासी बसला धडकला. बस चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला घेतली. त्यामुळे गंभीर अपघात टळला.

हेही वाचा- राज्य शासनातर्फे पुण्यात ‘ग्रंथोत्सव- २०२२’चे आयोजन

अपघातात ट्रक चालक नावेद खान आणि बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर खंडाळा घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. महामार्ग पोलीस; तसेच आयआरबी, डेल्टा फोर्स यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहायाने बाजूला केली. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

Story img Loader