पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शुक्रवारी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. यानंतर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अठक केली आहे. दरम्यान पोलीस संरक्षणात असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ११ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.

११ पोलीस कर्मचारी निलंबित

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कारवाईस सुरुवात केली आहे. अंकुश शिंदे यांनी आठ पोलीस कर्मचारी आणि तीन अधिकारी असे एकूण ११ जणांना निलंबित केलं आहे. चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्याच्या दोन साथीदारांनी शाई फेकली होती.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
anti-ragging rules, non-compliance of anti-ragging rules, National Medical Commission,
रॅगिंगविरोधी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा वैद्यकीय महाविद्यालयांना इशारा
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
pune pmc On first day of Sarvankash Swachhta 24 tons of garbage and billboards removed
महापालिका आयुक्तांचा आदेश आणि पहिल्याच दिवशी झाले इतके काम ! महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम, १६ टन राडारोडा, २४ टन कचराही उचलला

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, तिघांना अटक; कोण आहेत हे आरोपी?

नेमकी घटना काय?

चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी सायंकाळी चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. या पार्श्वभूमीवर हा शाईफेकीचा प्रकार घडला. पाटील हे चिंचवड गाव येथे मोरया देवस्थानच्या कार्यक्रमासाठी आले होते. या ठिकाणी एका व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली.

Video: पुण्यात चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ची घोषणाबाजी करत फेकली शाई

चंद्रकांत पाटील यांचं ते विधान काय?

पैठणमधल्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून महापुरुषांचा दाखला देत असताना हे वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत,” असं पाटील म्हणाले.

Story img Loader