पुणे: पुण्यातील कोलवडी ते थेऊर फाटा दरम्यान भरधाव कंटेनरने सायकलवरून जाणार्‍या ११ वर्षीय मुलाला दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामा पिंटू पवार वय ११ रा.थेऊर, असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर आरोपी सुनीलकुमार तेजबहादूर यादव मूळचा रा. उत्तरप्रदेश या कंटेनर चालकास अटक करण्यात आली आहे.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमधील स्वच्छतेची होणार केंद्रीय पथकाकडून पाहणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामा पिंटू पवार हा मंगळवारी दुपारच्या सुमारास कोलवडी ते थेऊर फाटा रोडवर सायकलवरून जात होता. त्यावेळी mh12 nx 3625 या क्रमांकाच्या कंटेनरने रामा पवारच्या सायकलला धडक दिली. या घटनेत रामाच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर या प्रकरणी कंटेनर चालक सुनीलकुमार तेजबहादूर यादव यास अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरु असल्याचे लोणी काळभोर पोलिसांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 year old boy riding bicycle was hit by a speeding container and died on the spot svk 88 mrj