लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे: पुणे आणि चिंचवड महापालिका हद्दीतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत कमीच नोंदणी झाली आहे. जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर काही प्रमाणात नोंदणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र यंदाही अकरावीच्या जागा रिक्त राहणार असल्याचे दिसून येत आहे.

राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरू होते. यंदा अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ३२४ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. या महाविद्यालयांमध्ये १ लाख १३ हजार ३९० एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यात कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी २४ हजार ९७७ जागा, तर केंद्रीभूत प्रवेशांसाठी ८८ हजार ४१३ जागा जागा आहेत. तर ८७ हजार २३८ विद्यार्थ्यांनीच प्रवेशासाठी नोंदणी केल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येते. राज्य मंडळाकडून जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत संधी दिली जाईल.

आणखी वाचा-नवउद्यमी संस्थापक, सहसंस्थापकांना प्राचार्य, संचालकपदासाठी संधी

गेली काही वर्षे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सातत्याने जागा रिक्त राहत आहेत. २०२०-२१ मध्ये १ लाख ७ हजार २१५ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ७१ हजार ७२२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. तर ३५ हजार ४९३ जागा रिक्त राहिल्या. २०२१-२२ मध्ये १ लाख १३ हजार ४४५ जागा उपलब्ध होत्या. ७४ हजार ३६८ विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन ३९ हजार ७७ जागा रिक्त राहिल्या होत्या. तर २०२२-२३ मध्ये १ लाख ११ हजार ७५० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी जवळपास ३३ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या.

पहिली यादी आज

शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीची निवड यादी आज (२१ जून) जाहीर करण्यात येणार आहे. या यादीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना लगेचच प्रवेश घ्यावा लागणार असून, त्यानंतर दुसरी फेरी राबवली जाणार आहे.