पुणे : समाज माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी झालेली मैत्री एका महिलेला महागात पडली. सायबर चोरट्याने परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलेची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचे समाज माध्यमात खाते आहे. समाज माध्यमातून महिलेची सायबर चोरट्याशी ओळख झाली होती. चोरट्याने परदेशात नोकरी करत असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर चोरटा आणि महिलेची ओळख झाली. परदेशातून भेटवस्तू पाठवितो, असे आमिष दाखवून चोरट्याने तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्याने महिलेशी संपर्क साधला. परदेशातून भेटवस्तू पाठविण्यात आल्या असून, विमानतळावर सीमाशुल्क विभागाने भेटवस्तू ताब्यात घेतल्या आहेत. भेटवस्तू सोडविण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे चोरट्याने सांगितले. त्यानंतर चोरट्याने महिलेला एका बँक खात्यात तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने बँक खात्यात वेळोवेळी ११ लाख ९५ हजार रुपये जमा केले. भेटवस्तू न मिळाल्याने महिलेने चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मोबाइल क्रमांक बंद असल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शरद झिने तपास करत आहेत.

हेही वाचा – बँक व्यवस्थापकाला धक्काबुक्की करून गोंधळ घालणारे अटकेत, लाडकी बहीण योजनेतील कागदपत्रांवरुन अरेरावी

हेही वाचा – पाषाण टेकडीवर महाविद्यालयीन तरुणाला लुटणारे गजाआड; अल्पवयीन ताब्यात

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणाची ११ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार तरुण नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात राहायला आहे. चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर शेअर बाजारात गुंतवणुकीसंदर्भात संदेश पाठविला होता. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. सुरुवातीला तरुणाला परतावा देण्यात आला. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 lakh fraud with a woman on lure of a gift pune print news rbk 25 ssb