पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीत १२ हजार २५३ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. तर ४ हजार ४७६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना २४ ऑगस्टपर्यत प्रवेश निश्चित करायचा आहे.

हेही वाचा – पुणे : आपल्याकडे चित्रकला आजही दुर्लक्षितच ; चंद्रमोहन कुलकर्णी यांची खंत

महाविद्यालयांमध्ये १ लाख ८ हजार ८३० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी ८५ हजार २४० जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत दोन नियमित फेऱ्या राबवण्यात आल्या. प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आणि महाविद्यालय प्रवेश सोमवारी जाहीर करण्यात आले. तिसऱ्या फेरीत ४ हजार ४७६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, २ हजार ३७० विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे, तर १ हजार ५२४ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. एकूण १२ हजार २५३ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. त्यात १ हजार २३४ विद्यार्थ्यांना कला शाखेत, ४ हजार ६७६ विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेत, ६ हजार ११० विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत आणि २३३ विद्यार्थ्यांना व्यवसाय अभ्यासक्रम शाखेत प्रवेश मिळाला.

हेही वाचा – पुणे : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ ; फर्ग्युसन रस्ता, बोट क्लब रस्त्यावर ऐवज हिसकावला

प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी आणि प्रवेशाची प्रक्रिया २४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी लागेल. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत सहभागी करून घेतले जाणार नाही. तिसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया २५ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे.

तिसऱ्या फेरीतही पात्रता गुण चढेच… प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीतही नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठीचे पात्रता गुण नव्वदीपारच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी चुरस असल्याचे दिसून येत आहे.

Story img Loader