जगभरात ज्या प्रश्नाने वैज्ञानिक हैराण झाले आहेत. अशा समुद्रातील प्रदूषणाच्या विषयावर पुण्यातील १२ वर्षीय छोट्या वैज्ञानिकाने मात्र उत्तर शोधले आहे. हाजीक काझी असे या लहानग्याचे नाव असून समुद्रातील प्लास्टिक आणि इतर कचरा काढण्यासाठी त्याने भन्नाट जहाजाची निर्मिती केली आहे. आपल्या या जहाजाचे नाव त्याने ERVIS असे ठेवले आहे. आपल्या या संशोधनाबाबत एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना हाजीक म्हणाला, ”मी काही डॉक्युमेन्ट्री पाहिल्या होत्या. त्या पाहून मला समुद्राच्या प्रदूषणाबाबत चिंता वाटू लागली. मग आपण यासाठी काहीतरी करायला पाहिजे असे वाटून मी कामाला लागलो. सुरुवातीला मी या समुद्रातील कचरा गोळा करणाऱ्या जहाजाबद्दलची सर्व माहिती शोधून काढली. त्यानंतर प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात केली.
12-year-old Pune-based boy Haaziq Kazi designs ship called ERVIS to help reduce pollution in the ocean and save marine life
Read @ANI Story | https://t.co/203IiInn3m pic.twitter.com/k7f5yC14s6
— ANI Digital (@ani_digital) January 23, 2019
आपण समुद्रातील जे मासे खातो ते मासे सध्या प्लास्टिक आणि इतर कचरा खाऊन जगत आहेत. म्हणजेच प्रदूषण हे एका चक्राप्रमाणे आहे, फिरुन ते पुन्हा आपल्यापर्यंतच येते. मात्र ERVIS या जहाजाव्दारे समुद्रातील कचरा वेगळा केला जाऊ शकतो. या जहाजातील तंत्रज्ञानावारे पाणी, समुद्रातील जीव आणि कचरा असे तीन वेगळे गट केले जातील. त्यानंतर पाणी आणि समुद्रातील जीव पुन्हा समुद्रात सोडण्यात येतील. मग कचऱ्याचे पाच भाग करुन त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येईल. आपली ही कल्पना हाजीकने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असलेल्या टेडएक्स आणि टेड8 यामध्ये मांडले आणि त्यामुळे त्याच्या या संशोधनाचे जगभरात कौतुक होताना दिसत आहे.