पुणे :  गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काळात नागरिकांना वेळीच वैद्यकीय उपचार करण्याची व्यवस्था विघ्नहर्ता न्यासतर्फे करण्यात आली आहे. ऊन आणि प्रचंड गर्दीमुळे नागरिकांना त्रास होत असून गेल्या चार तासांत १२२ नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत.विघ्नहर्ता न्यास तर्फे दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर नागरिकांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी व्यवस्था करण्यात येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Ganpati Immersion in Pune : मानाच्या पहिला कसबा गणपतीचे विसर्जन

यावर्षीही व्यवस्था करण्यात आली आहे. यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पाऊस नसल्यामुळे सकाळपासून कडक ऊन पडले आहे. तसेच गर्दीचे प्रमाणही वाढले आहे. मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झाली असून सकाळपासूनच लक्ष्मी रस्त्यावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.  ऊन आणि गर्दी यामुळे काही नागरिकांना त्रास झाल्याचे प्रकार घडले. गर्दीमुळे पहिल्या चार तासांतच १२२ लोकांना आपत्कालीन वैद्यकीय मदत पुरवावी लागली  असल्याचे  विघ्नहर्ता  न्यासचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 122 citizens suffer during ganpati immersion procession due to crowding and heat pune print news vvk 10 zws