डेंग्यू, मलेरिया यासारख्या कीटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार शहरात १ हजार २२८ डास उत्पत्ती स्थळे आढळून आली असून त्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६०४ नोटीसा जुलै महिन्यात आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्स्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. डासांच्या माध्यमातून डेंग्यू तसेच चिकुनगुनिया सारखे आजार होत आहेत. कीटकजन्य आजार रोखण्यासाठी ही मोहिम राबविली जात आहे. सोसयाट्या, घरे, गृहसंकुलांची तपासणी पथकाकडून करण्यात येत आहे. फुलदाणी, फ्रिजच्या मागील पाण्याचे ट्रे, कुंड्या, निर्माणाधीन बांधकामे, सरकारी कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेंग्यूचे डास आढळून आले आहेत. या सर्वांना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोटीस बजाविण्यात आली आहे.

शहरात एक जानेवारी २५ जुलै या कालावधीत १९५ डेंग्यू रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. त्यातील ५२ रुग्ण जुलै महिन्यातील आहेत. नोटीस दिल्यानंतरही संबंधितांकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास आणि डासांची उत्पत्ती सुरू राहिल्यास संबंधितांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1278 notice to mosquito breeding sites pune print news amy