पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी अनिकेत दूधभातेसह १३ जणांना रायगड जिल्ह्यातील माणगाव ओैद्योगिक वसाहत परिसरातून मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. नाना पेठेतील डोके तालीम चौकात रविवारी (१ सप्टेंबर) रात्री वनराज आंदेकर यांचा पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला.
हेही वाचा >>> सोलापूर रस्त्यावर डंपरची मोटारीला धडक; पिता-पुत्राचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी
याप्रकरणी त्यांची बहीण संजीवनी जयंत कोमकर, मेहुणा जयंत लक्ष्मण कोमकर, प्रकाश जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड यांना अटक करण्यात आली. गायकवाड याचा साथीदार अनिकेत दुधभाते आणि साथीदार पसार झाले होते. त्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात गायकवाड आणि दहिभाते राहायला आहेत. पसार झालेले आरोपी माणगाव परिसरात असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दुधभातेसह १३ जणांना ताब्यात घेतले.