पुणे : बनावट बिलांच्या आधारे वस्तू आणि सेवा कर विभागाची (जीएसटी) १३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी एका व्यापाऱ्याला अटक करणयात आली आहे.
या प्रकरणी शिव स्टील ट्रेडर्स कंपनीचे मालक दौलत शिवलाल चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. वस्तू आणि सेवा कर विभागाकडून कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत २७ व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. बनावट बिलांद्वारे फसवणूक करण्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर विशेष मोहिम आखण्यात आली आहे. शिव स्टील ट्रेडर्स या कंपनीच्या व्यवहारांबाबत जीएसटी कार्यालयातील विशेष पथकाला माहिती मिळाली होती. तपासणीत या कंपनीने कोणत्याही वस्तुची प्रत्यक्ष विक्री तसेच खरेदी केली नसल्याचे आढळून आले होते.
सखोल तपासणीत कंपनीने १३ कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्य कर सहआयुक्त रेश्मा घाणेकर, राज्यकर उपायुक्त (अन्वेषण) सुधीर चेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त ऋषीकेश अहिवळे, चंदर कांबळे, प्रदीप कुलकर्णी, श्रीकांत खाडे आदींनी कारवाई केली. चौधरी यांना अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करचुकवेगिरी प्रकरणात जीएसटी पुणे विभाग कार्यालयाकडून आतापर्यंत सहा व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.