नारायणगाव : जुन्नर तालुक्यात आर्थिक उत्पन्नासाठी अग्रगण्य असलेल्या वारूळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच राजेंद्र मेहेर यांच्यावर मनमानी कारभार करत असल्याचा ठपका ठेवून १७ पैकी १३ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे . या अविश्वास ठरावावर १७ मार्च रोजी दु. ३ वा. मतदान वारूळवाडी ग्रामपंचायत येथे मतदान होणार आहे.

वारूळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून राजेंद्र मेहेर हे गेली चार वर्षापासून सरपंच पदावर कार्यरत आहेत. काही दिवसा पासून सरपंच राजेंद्र मेहेर हे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर आणि मनमानी कारभार करत असल्याने अंतर्गत धुसपूस होती. ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात असलेले गणपीर बाबा ग्रामविकास पॅनलचे प्रमुख संजय वारूळे, जालिंदर कोल्हे आणि भागेश्वर ग्रामविकास पॅनल प्रमुख आशिष फुलसुंदर , देवेंद्र बनकर यांनी एकत्रित येवून सरपंच राजेंद्र मेहेर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि ग्रामपंचायत सदस्य विनायक भुजबळ , उपसरपंच सौ. रेखा फुलसुंदर , सौ. मीना वारुळे, नारायण दुधाने , सौ. सोनल अडसरे , जंगल कोल्हे , प्रकाश भालेकर, सौ. संगीता काळे , सौ. स्नेहल कांकरिया , देवेंद्र बनकर , किरण आल्हाट, सौ. माया डोंगरे , सौ. राजश्री काळे आदी १३ सदस्यांनी जुन्नर तहसील कार्यालय येथे तहसीलदार डॉ सुनील शेळके यांच्या समक्ष सह्या करून अविश्वास ठराव दाखल केला आहे. या अविश्वास ठरावावर १७ मार्च रोजी दु. ३ वा. मतदान वारूळवाडी ग्रामपंचायत येथे मतदान होणार आहे.