पुणे-सोलापूर रस्त्यावर सोरतापवाडी परिसरात पालखी दर्शनासाठी गेलेला १३ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कैलास ब्रिजलाल गौतम (वय १३, रा. सोरतापवाडी, लाेणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील ब्रिजलाल रामजानकी गौतम (वय ३९) यांनी यासंदर्भात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ब्रिजलाल गौतम मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. सोरतापवाडीतील एका रोपवाटिकेत ते कामाला आहे. ब्रिजलाल, पत्नी आणि मुलगा कैलास तेथे राहायला आहेत. २५ जून रोजी कैलास कडवस्ती परिसरात श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. त्यानंतर कैलास बेपत्ता झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तो घरी न परतल्याने ब्रिजलाल आणि त्यांच्या पत्नीने कैलासचा शोध घेतला. गौतम दाम्पत्य त्याचा शोध घेण्यासाठी बारामतीपर्यंत गेले होते. मात्र, त्याचा ठावठिकाणा न लागल्याने त्यांनी पोलिसांकडे तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांनी सांगितले.