बारामती : –  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत ७ ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजित विशेष तपासणी मोहीमे वायुवेग पथकामार्फत एकूण १४९ वाहनांची तपासणी करण्यात करुन २७ वाहनांवर कारवाई करण्यात आली; या दरम्यान एकूण २७ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कालावधीत बारामती ,दौड  आणि इंदापूर तालुक्यात मद्यप्राशन करून वाहन चालविणारे वाहनचालक तसेच नोंदणी क्रमांक नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. यापुढेही वाहने रस्त्यावर वाहने उभी करणे, वाहनांची कागदपत्रे सोबत न ठेवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, भार क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहनातून वाहतूक करणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे आदी वाहतूक विषयक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक सुरक्षा विषयक नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन श्री. निकम यांनी केले आहे.