पुणे : ऑस्ट्रेलियामध्ये उच्च शिक्षणासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १५ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर गेल्या पाच वर्षांत ही संख्या २० टक्क्यांनी वाढली असून, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी भारत, चीन, नेपाळ, कोलंबिया आणि व्हिएतनाम या देशांतील असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

युनिव्हर्सिटी लिव्हिंगतर्फे ‘बियॉण्ड बेड्स: डिकोडिंग ऑस्ट्रेलियाज् स्टुडण्ट हाऊसिंग मार्केट’ हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालानुसार ऑस्ट्रेलियातील शिक्षणाची मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षणाचे झपाटय़ाने विस्तारीकरण होत आहे. मार्च २०२३ पर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार ऑस्ट्रेलियात सहा लाख १३ हजार २१७ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Salary of hourly professors at Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University is overdue
नागपूर विद्यापीठाच्या तिजोरीत ठणठणाट? तासिका प्राध्यापकांचे वेतन थकले
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
Foreign Education Concepts Misconceptions Idea of ​​Education Career news
जावे दिगंतरा: परदेशी शिक्षण : समजगैरसमज
yavatmal Adv Pranav Vivek Deshmukh graduated from London School of Economics
यवतमाळचा विद्यार्थी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत
loksatta readers feedback
लोकमानस: पिढ्या बरबाद करणारे धोरण
IND vs AUS 5th Test Australia need 162 runs win Sydney Test
IND vs AUS : बोलंडच्या दमदार गोलंदाजीसमोर पंतचे अर्धशतक पडले फिके, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मिळाले १६२ धावांचे लक्ष्य
nagpur university indicate of increase in examination fees during the senate meeting
विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ होणार,विद्यार्थ्यांवर भूर्दंडाची ही आहेत कारणे

येत्या काळात काळात ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातील उच्च शिक्षणामध्ये नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी ३३ टक्के आहेत.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमुळे ऑस्ट्रेलियन अर्थव्यवस्थेमध्ये ३० अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलरपेक्षा अधिक भर पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, असे युनिव्हर्सिटी लिव्हिंगचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ अरोरा यांनी सांगितले.

परवडणाऱ्या निवास व्यवस्थेची कमतरता

ऑस्ट्रेलियामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या वाढतानाच परवडणाऱ्या निवास सुविधेची कमतरता निर्माण झाली आहे. निवासी भाडे आणि राहणीमानाचा वाढता खर्च, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता नसणे, शिक्षण संकुलांमध्ये निवासव्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना स्वस्त निवासी सुविधा मिळवण्यात अडचणी येत आहेत, असे सर्वेक्षणातून दिसून आले.

Story img Loader